छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्षपदी राहुल लष्करे
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे संचालक तथा लष्करे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेहरुण परिसरातील युवा उद्योजक राहुल लष्करे यांची छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पद्मालय विश्रामगृह येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे, प्रांजल नेमाडे, शांताराम अहिरे, भीमराव सोनवणे, खंडेराव महाले, लकी वानखेडे, रोहित सोनवणे, किशोर पाटिल व महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर नियुक्ती बद्दल नगरसेवक प्रशांत नाईक, भाजपा बारा बलुतेदार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी, परिवहन महामंडळाचे निलेश सपकाळे यांच्यासह मेहरूण व एम.आय.डी.सी. परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी राहुल लष्करे यांचे अभिनंदन केलेले आहे.
छावा मराठा युवा महासंघाच्या माध्यमातुन समाजातील उपेक्षित व अन्यायग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे यावेळी राहुल लष्करे यांनी सांगितले. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवकांनी छावा मराठा युवा महासंघात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले आहे.