⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Putin Dead : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मृत्यू, बहुरूपी देतोय भाषण?, ब्रिटनच्या यंत्रणेचा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन देशावर हल्ला केल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ च्या (MI6) यांच्याकडून देण्यात आले आहे. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्त दिले आहे. इतकंच नव्हे तर त्यांचा डुप्लिकेट सध्या संवाद साधत असल्याचे देखील त्या यंत्रणेने म्हटले आहे.

काही विदेशी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांपासून पुतीन यांची प्रकृती बरी नाही, याबाबतच्या बातम्या जगभरातील वृत्तवाहिन्या प्रकाशित करत होत्या. मात्र आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ च्या (MI6) प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा केला आहे. यंत्रणेने केलेल्या या दाव्याने जगाची झोप उडाली आहे. कुणीतरी बहुरूपी देश चालवतो आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या दाव्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धावर पुतीन यांच्या निधनाचा परिणाम होऊ शकतो यासाठी ही बातमी अजून नागरिकांच्या समोर आलेली नाही. तसेच जनतेला संबोधित करताना बहुरूपी व्यक्तीचे व्हिडीओ चित्रीकरण केले गेले असून ते दाखविले जात असल्याचे देखील त्यात म्हटले आहे.

सध्या पुतीन त्यांचे वय ६१ वर्षे आहे. त्यांनी युक्रेनविरुध्द हल्ला करताना जे भाषण केले तेव्हा पुतीन यांचा चेहरा सुजलेला होता असे म्हटले जाते. पुतिन यांना रक्ताचा कर्करोग असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. यामुळे याच गंभीर आजार यामुळे त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. पुतीन यांच्या मृत्यूच्या दाव्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसल्याने या दाव्यात कितपत तथ्य आहे हे सांगणे अवघड आहे.