Breaking : 12 हजाराची लाच घेताना अमळनेरच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पटरला अटक

सप्टेंबर 24, 2025 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात सरकारी बाबू कडून घेतलेल्या जाणाऱ्या लाचेच प्रकार वाढतच चालले असून अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमळनेरात केलेल्या कारवाईत दोन पोलीस कॉन्स्टेबलसह त्यांच्या पंटरला १२ हजार रुपयाची लाच घेताना अटक केली. या अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे असं लाचखोर पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर उमेश भटू बारी असं त्यांच्या पंटरचे नाव असून या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

याबाबत असे की, तक्रारदार हे अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मधून कॉम्प्रेसर मशीनच्या सहायाने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. सदरचा व्यवसाय करत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे हे तक्रारदार व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी येवुन तक्रारदार यांना “तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५,०००/- रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो.” असे सांगुन तक्रारदार यांना धमकी दिली.

याबाबत लाचेची मागणी केल्याची तक्रारदार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात केली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पथक तयार करून सापळा रचला. या पथकाने सापळा लाऊन अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे या दोघांना बारा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पाचपावली मंदिराजवळच्या एका पान टपरीवर करण्यात आली. याप्रकरणी दोघांसह त्यांचा पंटर उमेश बारी अशा तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now