---Advertisement---
नोकरी संधी

पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी..

---Advertisement---

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank Recruitment 2022) मध्ये नोकरीची संधी आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये सफाई कामगार या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असणार आहे.

Punjab National Bank Recruitment 2022 jpg webp

एकूण जागा : 34

---Advertisement---

पदाचे नाव : सफाई कामगार (Sweeper / Cleaner) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतीही शिक्षणाची अट नाही.दहावी नापास किंवा अगदी निरक्षर उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.दहावी किंवा त्याहून अधिक शिकलेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र नसतील.जे उमेदवार सर्व अटी आणि शर्थीनुसार पात्र असतील अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा :

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 18 ते 24 या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा

ओपन – एकूण जागा 16

ओबीसी – एकूण जागा 09

एसटी – एकूण जागा 03

एससी – एकूण जागा 03

इडब्लूएस – एकूण जागा 03

नोकरीचं ठिकाण : अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो,

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---