जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमचेही सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. Punjab National Bank Bharti 2025

बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnb.bank.in वर या भरतीची अधिसूचना उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांना देशभरातील विविध शाखांमध्ये नियुक्त केले जाईल.

आवश्यक पात्रता काय?
कोणत्याही शाखेतील पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षांची वयोमर्यादा, ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची आणि अपंग उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादा सूट मिळेल.

या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा, लोकल लँग्वेज टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही परीक्षा डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे.
अर्ज शुल्क: या पदांसाठी अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी १,१८० रुपये आणि अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ५९ रुपये आहे.
वेतनश्रेणी
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹४८,४८० ते ₹८५,९२० पर्यंत वेतन मिळेल.






