झांबरे माध्यमिक विद्यालयात वन्यजीव संरक्षण संस्थेमार्फेत नागपंचमी निमित्ताने जनजागृती
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । झांबरे माध्यमिक विद्यालय नागपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांना वन्यजीव संस्थेचे सर्पमित्र जगदीश बैरागी, सर्पमित्र राजेश सोनवणे, सर्पमित्र हेमराज सपकाळे यांनी भारतात आढळून येणाऱ्या सर्पाच्या प्रजाती यांची ओळख पोस्टर व्दारे करून दिली. सापाची वर्तन, सर्पदंश,, प्रथमोपचार,धोका, जोखीम या विषयी माहिती दिली व आपल्या परिसरात सर्प आढळून आल्यास सर्पमित्रास कळवून निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या अधिवासात सोडून दिले जाते यासाठी नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे.
याप्रसंगी समाजातील अंधश्रद्धा कशी फोफावत असते हे प्रात्यक्षिक सादरीकरण केले . विषारी साप व बिनविषारी साप कसे ओळखले जातात ,त्यांचे भक्षक याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, हरित सेना विभाग प्रमुख चंद्रकांत कोळी ,तुषार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक सतिश भोळे ,संगित शिक्षक प्रवीण महाजन ,शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक तायडे, चंदन खरे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.