⁠ 
शनिवार, मे 11, 2024

अभिमानस्पद ! शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यूरोलॉजीस्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । शेतकऱ्यांच्या डॉक्टर मुलाने न्यूराेलाॅजी परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवून गाेल्ड मेडल प्राप्त केले अाहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील पहूर सारख्या ग्रामीण भागात राहून त्याच ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी परिस्थितीची कोणतीही तमा न बाळगता आपल्या हुशारीच्या जोरावर मजल दर मजल करत पहूर गावाचे नाव देशपातळी वर उंचावतो, त्याचा सार्थ अभिमान आज पहूरकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.


सध्या डाॅ. घाेलप मुंबईत बिना टाक्याच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया या विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, अंबानी हॉस्पिटलमधील न्यूरॉलॉजी विभागातील सर्व शिक्षक, मित्र व पहूर येथील घोलप परिवराला दिले. डॉ. घोलप यांची पत्नी डॉ. आसावरी घोलप (एम.डी. पॅथॉलॉजी) या न्यूरो पॅथॉलॉजीचे मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असून लहान भाऊ डॉ. सिद्धांत घोलप (एम. डी. बालरोग तज्ज्ञ) असून सदयस्थितित ते मुंबई येथे लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात शिक्षण घेत आहे. तर भाऊ डॉ. अमोल घोलप शेंदुर्णी येथे लहान मुलांचा रुग्णालयात सेवा देत आहे.


डॉ. गोपाल घोलप यांचा पहूर येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पहूर पेठ जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावी व बारावी परीक्षेतही त्यांनी चांगले यश मिळवले. यानंतर वडील अरुण घोलप यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास उराशी बाळगून असलेल्या डॉ. गोपाल घाेलप यांनी नीट परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात पाहिजे ते वैद्यकीय महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी सन २००७ मध्ये एन. टी. प्रवर्गातून राज्यात १३ क्रमांक प्राप्त करून एमबीबीएसचे मुंबईच्या के. ई. एम. काॅलेजात शिक्षण पूर्ण केले.

२०१४मध्ये एम.डी. प्रवेश परीक्षेत एन. टी. प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांकाने यश संपादित करुन त्यांनी एम.डी. मेडिसिनची पदवी प्राप्त केली. शिक्षण सुरुच ठेवण्याचा निर्धार करत त्यांनी डीएनबी न्यूरॉलॉजी प्रवेश परीक्षेत यश मिळवले व कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये शिक्षण पूर्ण केले. याच हॉस्पिटलमध्ये फेलाे इंटरव्हेन्शन न्यूराेलाॅजीचे शिक्षण घेताना डिसेंबर २०२० मध्ये घेतलेल्या अंतिम परीक्षेत डॉ. गोपाल घोलप यांनी देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे.