अभिमानास्पद : भरत अमळकर यांची महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेवर नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेवर जळगाव येथील केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती पाच वर्षाकरिता होत असते.

महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षण व औषध निर्माणशास्त्र यांच्या अभ्यासक्रमाचे व परीक्षांचे नियोजन व नियंत्रण करणारे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आहे. शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे कामकाज चालते. संचालक, तंत्रशिक्षण मंडळ याचे पदसिद्ध सचिव असतात व अन्य सभासदांमध्ये प्रधान सचिव तसेच संचालक तंत्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र हे देखील असतात.

जळगाव येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती तसेच उद्योजक भरत अमळकर यांची महाराष्ट्र शासनाने नियामक मंडळावर सदस्य म्हणून पाच वर्षाकरिता नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.