भुसावळ तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन ; काय आहेत मागण्या..

फेब्रुवारी 20, 2024 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून तीन महिने होऊन देखील अद्यापही दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिक विम्याची भरपाई देखील अद्याप प्रलंबित असल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकरी हे आक्रमक झाले आहे.

bsl farmer strick jpg webp

शेतकऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधात असताना राजकारण्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असून शेतकऱ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now