जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२४ । आज जळगाव जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाल गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. या मोर्चा दरम्यान काही तरुणांकडून उघडे असलेले बाईकच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आल्यामुळे तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत असे की, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली. यादरम्यान, जळगाव शहरात हिंदू समाजाच्या वतीने आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.
मात्र या निषेध मोर्चात काही तरुणांकडून उघडे असलेल्या बाईकच्या शोरूम वर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. दगडफेकीच्या घटनेनंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ करण्यात आला असून सदर घटनेमुळे मोर्चात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.