---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

कर्नाटक मधील घटनेचा चोपड्यात निषेध

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२। कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घुण हत्या करण्यात आली. याचा चोपडा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी संघटनाकडून निषेध व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शाह यांना तहसिलदार अनिल गावित यांच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली आहे.

nivedan 13

निवेदनात म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी विष पसरवण्याचे कार्य केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे शिमगो येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या आहे. या दुर्दैवी घटनेतील आरोपींना जरब बसेल अशी शिक्षा व्हावी, सिमीचे दुसरे रूप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी. या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रातील रुजलेले आहेत. त्यावर बंदी घालून योग्य बंदोबस्त करावा. अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी संघटनाकडून करण्यात आली आहे.

---Advertisement---

यावेळी रा.स्व.संघ विभाग चालक राजेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते दिलिप नेवे, हिंदुजनजागरण समिती यशवंत चौधरी, सरचिटणीस हनुमंतराव महाजन, डाॅ.मनोहर बडगुजर, सहकार आघाडी अध्यक्ष हिंमतराव पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रखंड मंत्रीबजरंग दल पवन चित्रकथी, रा.स्वसंघ तालुका कार्यवाह मनोज विसावे, जिल्हायुवा मोर्चा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, किसानमोर्चा अध्यक्ष भुषण महाजन, भाजपा ता.चिटणीस भरत सोनगिरे, सनातन संस्था सुधाकर चौधरी, अनिल पाटील, शिवसेना पदाधिकारी प्रविण जैन, मनसे विद्यार्थीआघाडी निलेश बारी, शहर सचिव महेंद्र भामरे, युवामोर्चा विवेक गुर्जर, रा.स्व.संघ शुभम नेवे, रा.स्व.संघ गौरव अग्रवाल, अजय भोई, अर्जुन चौधरी, जितेंद्र बारी, मोल भाट, सुधाकर महाजन, गोपाल पाटील, सुनिल पाटील, हरेश्वर पाटील व सुधाकर चौधरी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---