चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा मोठा पर्दाफाश; 6 पीडित महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हे दाखल

मे 30, 2026 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२६ । चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने शहरातील प्रताप हायस्कूल आणि तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 6 पीडित महिलांची सुटका केली असून, दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ९ जण फरार झाले आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

kuntankana jpg webp

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे, काल दि २९ मे सायंकाळी ६:४० वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी रस्त्यालगत पोलिसांनी अचानक छापा टाकला. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय देऊन, त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शिल्पा राजू लामा (वय ३५, रा. चोपडा) सह पूजा टीकाराम थापा (वय २९, रा. चोपडा) या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिवाजी भिमराव पाटील (रा. चोपडा), फरीद कबीर शेख (रा. चोपडा), शाहबद वाहिद खान (रा. चोपडा), शरिफ सत्तार तडवी (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे (रा. चोपडा), फिरोजी हंसा खान (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे (रा. चोपडा), संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील (रा. चोपडा), सुरेंद्र राजपूत (रा. चोपडा) हे ९ जण घटनास्थळावरून फरार झाले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ज्या 6 महिलांची सुटका केली, त्या प्रामुख्याने राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या पीडित महिलांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून त्यांना कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now