जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । जिल्ह्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन द्वारे अन्नधान्य देण्यात यावे असे आदेश अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची नावे सरकार दस्तरी नोंदवण्यात यावी असे आदेश देखील पारित करण्यात आले आहेत.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत अन्न योजने अंतर्गत महिलांना तात्काळ अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा असे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. शासनाने दिलेल्या या निर्णयामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आधार मिळाला आहे. या योजनेअंतर्गत या महिलांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रति मनुष्य प्रतिभा पाच किलो धान्य देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा:
- आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील; वाचा रविवारचे तुमचे राशिभविष्य
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..