---Advertisement---
गुन्हे भुसावळ

लाच भोवली ; ५ हजाराची लाच स्वीकारताना सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भुसावळ न्यायालयातील सरकारी वकिलास पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना जळगावात रंगेहाथ पकडले. अ‍ॅड. राजेश साहेबराव गवई असे लाच घेणाऱ्या वकिलाचे नाव आहे.

crime

भुसावळातील एका प्रकरणात अटक असलेल्या आरोपीच्या जामीनाला विरोध करण्यासाठी सरकारी वकिलाने तक्रारदाराकडून पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेवून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलीस निरिक्षक उज्ज्वल पाटील व प्रशांत सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश महाजन यांनी जळगावातील पाटबंधारे कार्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सापळा रचला. 

---Advertisement---

अखेर भुसावळ न्यायालयातील सरकारी वकील राजेश गवई यांनी पाच हजार रूपयांची लाच घेताच, त्यांना नाशिकच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---