महाराष्ट्रराजकारण

ED चा नवाब मलिकांना पुन्हा झटका ! कोट्यवधींची संपत्ती जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate) पुन्हा एकदा मोठा झटका दिलाय. तो म्हणजे ईडीने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली आहे.

यामध्ये नवाब मलिक कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्नानाबाद येथील १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश असल्याचे समजते. ‘ईडी’ने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची सातत्याने चौकशी सुरु आहे.

यादरम्यानच्या काळात ईडीने त्यांच्या मालमत्तांची माहिती गोळा केली होती. ही सर्व माहिती घेतल्यानंतर ईडीने अखेर नवाब मलिक यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button