जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी १० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यास अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांनी रंगेहात अटक केली आहे. आनंद देविदास विद्यागर, (वय-५०, प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय,जळगाव) असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत असे की, भुसावळ येथील तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून सदर प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात आनंद विद्यागर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. याबाबची तक्रारदार यांनी अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांना १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालय जळगाव येथे रंगेहात अटक केली.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांनीं हा सापळा रचण्यासाठी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पो.नि संजोग बच्छाव, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे, पो हे कॉ. सुनिल पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी, पो ना. सुनिल शिरसाठ, पो ना. जनार्धन चौधरी, पो कॉ. नासिर देशमुख, पो कॉ. ईश्वर धनगर, पो कॉ. प्रदिप पोळ, पो काॅ. महेश सोमवंशी यांचा समावेश होता.