जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात! किती मिळतोय भाव?

एप्रिल 5, 2025 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराप्रमाणे नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात झाली आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड जामनेर पाचोरा भडगाव आणि चाळिसगाव या तालुक्यांमध्ये एकूण १६ हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर या 16 तालुक्यासह पाळधी येथे ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी केंद्र कार्यरत आहे.

jwari maka harbhara

हरभरा:
हमीभाव:5650 रुपये प्रति क्विंटल
शेतकरी नोंदणी कालावधी: 27 मार्च 2025 ते 25 एप्रिल 2025
खरेदी कालावधी: 01 एप्रिल 2025 ते 29 जून 2025

ज्वारी, मका आणि बाजरी:
हमीभाव:
ज्वारी: 3371 रुपये प्रति क्विंटल
मका: 2225 रुपये प्रति क्विंटल
बाजरी: 2625 रुपये प्रति क्विंटल
शेतकरी नोंदणी कालावधी: 02 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025
खरेदी कालावधी: 01 मे 2025 ते 30 जून 2025

शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरीची नोंदणी आणि खरेदीचा लाभ घ्यावा व ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि ऑनलाइन पोकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्याक्ष रोहित दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार तसेच .जिल्हा पणन अधिकारी, जळगांव एस.एस.मेने यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment