४ हजाराची लाच घेताना चाळीसगावचा खाजगी इसम जाळ्यात

मे 5, 2026 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच, चाळीसगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या कागदपत्रांची प्रमाणित नक्कल काढून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खाजगी इसमाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली आहे. सुनील शिवदास निकम उर्फ नाना (वय ४७, रा. आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर खाजगी इसमाचे नाव असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

sunil nikam

नेमकी घटना काय?

त्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणारा खाजगी इसम सुनील निकम उर्फ नाना याने ही कागदपत्रे मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या पैकी ५ हजार रुपये आरोपीने आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित ४ हजार रुपये प्रत्यक्ष कागदपत्रे हातात देताना देण्याचे ठरले होते.

एसीबीने रचला सापळा

तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धुळे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पडताळणी करून चाळीसगावात सापळा रचला. नियोजित योजनेनुसार, आरोपी सुनील निकम याने दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कागदपत्रांची नक्कल तक्रारदाराला दिली आणि जशी त्याने उर्वरित ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली, तशीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणी लाचखोर आरोपी सुनील निकम याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शासकीय किंवा सार्वजनिक सेवांशी संबंधित कामांसाठी अशा प्रकारे बेकायदेशीर पैशांची मागणी करणे हा गंभीर गुन्हा असून, लाचखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now