⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

खळबळजनक ! जिल्हा कारागृहात कैद्याकडून पोलीस शिपायावर लोखंडी पत्र्याने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कैद्याने कारागृहातील एका पोलीस शिपायावर धारदार लोखंडी पत्र्याने हल्ला करत स्वत:च्या डोक्यातही पत्र्याने वार करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सचिन दशरथ सैंदाणे असं हल्लेखोर कैद्याचं नाव असून राहुल राम घोडके (वय २९, रा. सब जेल क्वार्टर) असं कैद्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?
जळगाव जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके आणि सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी ६ वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी ते गेले. त्याने अंगझडतीला विरोध केला आणि कर्मचाऱ्यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी पत्र्याने कर्मचाऱ्याला मारत स्वत:च्या डोक्यातही पत्र्याने वार करून घेतले.

घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहाला भेट दिली. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. याबाबत पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात २५ सप्टेंबर २०१६ पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा :