---Advertisement---
महाराष्ट्र

पंतप्रधानांचा सुरक्षा रक्षक आला उत्तर महाराष्ट्रात अन् जगाचा घेतला निरोप! : वाचा धक्कादायक बातमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय सुरक्षा दलातील जवान नुकताच उत्तर महाराष्ट्र्रात आला होता. यावेळी त्याने शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र परतत असतानां जवानाचा मृत्यू झाला.हि घटना आज सकाळी घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ganesh gite jpg webp webp

गणेश सुखदेव गिते असे जवानाचे नाव असून ते ते पत्नी आणि मुलांसह शिर्डीला गेले होते. घरी परत येत असताना सिन्नर तालुक्यात चोंढी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. ते दुचाकीने प्रवास करत होते.

दुचाकीचा अपघात होऊन ते गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. अपघात झाल्याची बाब लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत गणेश गिते यांच्या पत्नी आणि मुलांना बाहेर काढले.मात्र दुर्दैवाने जवान गीते वाहून गेले. अपघाताची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांना समजताच ते घटनास्थळी रवाना झाले.२४ फेब्रुवारी रोजी गणेश गिते हे सुट्टीवर आले आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---