⁠ 
शनिवार, मे 4, 2024

शिधापत्रिका धारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; वाचून खुश व्हाल

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत रेशन योजना ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY)’ 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे आणखी पाच वर्षे मोफत रेशन मिळेल. यापूर्वी मोफत रेशन योजना 31 डिसेंबर 2023 दिली जाणार होती. मात्र PMGKAY ची टाइमलाइन पूर्ण होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे.

2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात सरकारने शिधापत्रिका असलेल्या लोकांना ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला होता आणि या योजनेंतर्गत अनेक महिने मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर सरकारने PMGKAY आणि NFSA योजना एकत्र केल्या.

सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील 81 कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना NFSA अंतर्गत धान्य दिले जाईल आणि लाभार्थ्यांना धान्य मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत. हे धान्य कोणत्याही भारतीय व्यक्तीला पूर्णपणे मोफत दिले जाईल.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथे मोफत रेशनबाबत मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप सरकारने आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देतात, असे मोदी म्हणाले.