Amalner : मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू, अमळनेरातील दुर्देवी घटना

फेब्रुवारी 6, 2025 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यामध्ये पूजा सुरु असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद या गावालगतच्या नदीकाठावर घडली आहे. अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

jalod

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती. सदरची पूजा करण्यासाठी घरातील मंडळींसह पुजारी गेले होते. सदरची पूजा हि नदीकाठावरच करावी म्हणून अमळनेर येथील पुजारी अमोल शुक्ल (वय ३८) यांनी सांगितले होते. त्यानुसार जळोद येथे नदीकाठावर पुलाखाली देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती.

पूजेसाठी होम पेटवला असता त्यामुळे धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाश्‍यांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहोचला. यानंतर मधमाश्‍या उठल्याने त्यांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला चढविला. मधमाश्यांचा हल्ला झाल्याने पूजेसाठी जमलेले सर्व जण सैरावैरा पळू लागले. मात्र पुजारी अमोल शुक्ल यांनी पळू नका. खाली झोपून घ्या; त्या चावणार नाहीत असे सर्वाना सांगत ते खाली वाकले.

पुजारी अमोल हे खाली वाकून राहिल्याने मधमाश्‍या त्यांच्या तोंडाला चावल्या. यात ते जखमी झाले होते. त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर इतर पाच ते सहा जणांनाही मधमाश्‍या चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांच्यावर अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now