पारोळा येथे संशयास्पदपणे फिरणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

एप्रिल 7, 2022 9:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । पारोळा शहरासह तालुक्यात सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन चोर्‍या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर येथील पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. बुधवारी दुपारी शहरातून काही जण संशयास्पदरित्या फिरतांना पोलिसांना आढळून आले. त्यांच्यावर कलम १०९ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

polis jpg webp

गणेश शंकर चव्हाण (वय २६, रा. कसबे, ता.जामनेर), दादाराव किसन चितोडे (रा. अंबड, जि.जालना), काज्या अनाज्या वासकले, तेवज्या बाक्या वासले, कमल दुकान्या वासले, राण्या रामसिंग वासले, अनिल कटुल्या वासले (रा.सर्व रा.रसमल, ता.पाटी, जि.बडवानी), संजय गुलाब शेमले (रा.गोलपाणी, ता.पाटी, जि.बडवानी), सोहज्या रामसिंग वासले आणि दिनेश सुकलाल वासले असे संशियास्पदपणे फिरणाऱ्यांचे नाव आहेत. या सर्वांवर कलम १०९ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून, सर्वांना तहसीलदार गवांदे यांच्यासमोर हजर केले. या सर्व संशयितांची माहिती त्यांच्या राहत्या पत्त्यावरील पोलिस स्टेशनला कळवली आहे. तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड मागवले आहे. या तपासातून त्यांचा अलीकडच्या काळातील गुन्हेगारी कृत्यांमध्ये हात आहे का ? याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Advertisements

यांनी केली ही कारवाई

Advertisements

पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक राजू जाधव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मराठे, इकबाल शेख, जावेद शेख, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजित पाटील व आशिष गायकवाड यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now