जळगाव शहर
ओरियन शाळेत प्रिफेक्ट इन्व्हेस्टिचर कार्यक्रम संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल जळगाव या शाळेत प्रिफेक्ट इन्व्हेस्टिचर कार्यक्रम संपन्न झाला.के.सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेत असलेल्या रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस, ब्लू हाऊस यांच्यातील विद्यार्थ्यांची कॅप्टन आणि प्रिफेक्ट म्हणून निवड करण्यात येऊन त्यांच्या मधून हेड बॉय पियुष पाटील आणि हेड गर्ल भक्ति महाजन यांची निवड करण्यात आली. शालेय शिस्त राखण्यात विशेष मदत करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शशिकांत वडोदकर, शाळेचे प्राचार्य ब्रूस हँडसन आणि उपप्राचार्य चंद्रकला सिंग यांनी अभिनंदन व कौतुक केले. सदर कार्यक्रमास पालकांची उपस्थिती होती.