---Advertisement---
जळगाव जिल्हा

प्रविण सपकाळे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यध्यक्षपदी निवड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या राज्य कार्यध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड पुणे येथे दि.१६ मार्च रोजी आयोजित राज्य कमेटीच्या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केली.

pravin sapkale jpg webp

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत राज्याचे महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी प्रस्तावित केले. तर प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी संघटनेच्या धोरणात्मक विषयावर मार्गदर्शन करून पुढील कामकाज संदर्भात सूचना दिल्या. दरम्यान पत्रकार संघाचा उपक्रमशील पदाधिकारी असलेले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असलेले प्रवीण सपकाळे यांची राज्य कार्यध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यास सर्व राज्य कार्यकारणीच्या पदाधिकारी, सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, विदर्भ विभाग अध्यक्ष महेश पानसे, मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी माझ्यावर राज्य कार्यध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. संघटनेत काम करणाऱ्या एका ग्रामीण भागातील सामान्य पत्रकारावर संघटनेने विश्वास दाखवला यापुढेही संघटनेत व्रतस्थ भावनेने काम करेल, वसंतराव मुंडे यांची राज्यातील तळागाळातील पत्रकारांसाठी लढण्याची तळमळ, लढाऊ वृत्ती आमच्यासाठी प्रेणादायी आहे.
— प्रविण सपकाळे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---