जळगाव विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच; प्रताप पाटील यांचे नाव पुढे आल्याने भाजपासमोर पेच!

एप्रिल 23, 2026 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपासोबत शिंदे सेनेदेखील तयारी सुरु केल्याने महायुतीमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात शिंदे सेनेची ताकद गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे ही जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे.

pratapbhau

महायुतीच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वानुमते निर्णय घेवून महायुती एकच उमेदवार देईल. मात्र, जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास आणि दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार कायम ठेवल्यास जिल्ह्यात ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत पाहायला मिळू शकते. महायुतीमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच, शिंदे सेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर दिसून येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क आणि संघटनात्मक बांधणी पाहता, त्यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना संधी मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे. प्रताप पाटील यांनी गेल्या काही काळापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सक्रिय आहेत. प्रत्येकाच्या सुखा-दुख:त धावून जाणे, सर्वसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंड आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपकडून नंदकुमार अडवाणी, माजी जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, शिंदे सेनेने प्रताप पाटील यांच्या रूपाने एक प्रबळ चेहरा समोर आणल्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीत भाजप आणि शिंदे सेना दावा करत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मतदारांची भूमिका या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकते. मविआने अद्याप सावध पवित्रा घेतला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now