---Advertisement---
जळगाव जिल्हा सरकारी योजना

चारशे रुपयात मिळणार वीस हजाराचे विमा संरक्षण ; शेतकऱ्यांसाठी योजना

pikvima
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै, 2021 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

pikvima

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

---Advertisement---

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम-2021 मध्ये राबवण्यिात येत आहे.  योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.

खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,

बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,

भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये,

तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,

मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,

तुर– विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,

कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये,  

मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी व इतर पिकांसाठी 2 टक्के व कापूस पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण

आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव, पाचोरा, अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, जळगाव, भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई. टोल फ्री क्रमांक 1800 103 7792, श्री. गजानन पाटील  8087305060 , जिल्हा व्यवस्थापक, सामान्य सुविधा केंद्र (सी. एस. सी केंद्र) येथे संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---