जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणच्या पथकाने २४ रोजी धडक कारवाई केली. त्यात ९० जणांवर कारवाई झाली आहे.

काही दिवसांपासून रणगाव आणि गहुखेडा येथे गावात वारंवार फ्युज उडणे, अतिभारमुळे तार तुटणे यामुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सावदा विभागातील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक अभियंता योगेश चौधरी, विशाल किनगे, कनिष्ठ अभियंता मंगेश यादव, सचिन गुळवे यांच्या पथकाने रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकणाऱ्यांवर कारवाई केली. आगामी काळातही कारवाईची मोहीम सुरु राहणार असल्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांनी सांगितले.

हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






