---Advertisement---
जळगाव शहर

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्‍त डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२३ । आज ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातील संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आले. याप्रसंगी तंबाखू सेवनाचे दृष्परिणाम व उपचार पद्धती याविषयी रुग्णांना सविस्तर माहिती दिली.

Poster presentation jpg webp webp

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राचे डॉ.विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील निवासी डॉक्टरांनी पोस्टर प्रेझेंट केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशनानुसार सन २०२३ मध्ये आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे ही संकल्पना घेऊन जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला.

---Advertisement---

यावेळी तंबाखूचे शरिरावर होणारे दृष्परिणाम तसेच व्यसनमुक्‍तीसाठी आवश्यक उपचार पद्धती याची सविस्तर माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रसंगी संकल्प व्यसनमुक्‍ती के्ंरदातील निवासी डॉ.विकास गायसमुद्रे, डॉ.आदित्य जैन, डॉ.सौरभ, डॉ.काईनात, ज्योती नामदेव आदि उपस्थीत होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---