जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात ३६ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ती आपला उदरनिर्वाह करते. १३ जुलै रोजी रात्री जेवण करून झोपलेली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. त्यानंतर अश्लिल फोटो व्हॉटसॲपवर पाठविले.
यासंदर्भात गुरूवार १४ जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.