जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । एका २८ वर्षीय तरुणीला इन्स्ट्राग्रामवर अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भुसावळ शहरातील २८ वर्षीय तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिला दि. ५ जून ते ८ जून दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने कारण नसताना इन्टाग्रामवर अश्लिल मेसेज पाठविले. अशा पध्दतीने वारंवार अश्लिल मेसेज पाठवून तरुणीला त्रास देत असल्याने तरुणीने बुधवारी दि. ७ रोजी याबाबत सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.