---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

राजकारणात मोठी खळबळ; ‘या’ प्रकरणात आमदाराच्या पीएला अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे. राज्यातील एका आमदाराच्या स्वीय सहायकाला पोलिसांनी अटक केली असलायचे वृत्तसमोर आले आहे. नंदू ननावरे पती- पत्नीच्या आत्महत्येला तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख मालोजी शिंदे यांनी दिली.

image 30 jpg webp webp

ननावरे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ काढून आत्महत्येस रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संग्राम निकाळजे आणि दोघा देशमुख वकील बंधूंना जबाबदार धरल्याचा उल्लेख केल्याने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाला गती प्राप्त होत नसल्याच्या निषेधार्थ मृताचे भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर, पोलिसांनी चौघांना अटक केली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---