⁠ 
सोमवार, मे 20, 2024

राजकीय भूकंप : महाराष्ट्र्र काँग्रेसमध्ये होणार मोठं बंड?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । शिवसेनेनंतर आता काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे काही आमदार आता भाजपामध्ये सामील होणार आहेत. शिवसेनेसारखरेच काही काँग्रेसचे माजी मंत्री सुद्धा पक्षात बंडाळी करणार असून भाजपात जाणार आहेत. याच बरोबर चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीच्या सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहेत. यामुळे आता काँग्रेस सुद्धा फुटणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धच्या बंडानंतर परिस्थिती जरा कुठे निवळले आहे असे वाटत असतानाच आता महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा वाटत आहे. करणं महाराष्ट्र काँग्रेसचे काही बडे नेते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे आता काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी ७ आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. बऱ्याचकाळापासून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. यात एका माजी मुख्यमंत्र्यांसह ४ माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता काँग्रेसचे हे ७ आमदार कोण, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.