जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता ”तसला” व्यवसाय ; चार महिलांची सटका

एप्रिल 19, 2025 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । जळगाव शहरातील अत्यंत वर्दळीच्या गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देह विक्रीचा व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका करण्यात आली. या स्पा सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जळगाव येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

raid

याबाबत असे की, शहरातील गोविदा रिक्षा स्टॉपजवळ नयनतारा ऑर्किड मॉलमध्ये डे स्पा सेंटर शॉप नं.४०८ येथे स्पा सेंटरच्या आड ग्राहकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करण्यात येत होता. या सेंटरचा मॅनेजर, ४ महिला मसाज सेंटरच्या आड देहविक्रय व्यवसाय करीत होत्या. त्यास त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी (वय २० वर्ष, रा. वार्ड नं.०६ चत्तरगढ पत्ती जि सिरसा हरीयाना) हा प्रोत्साहन देत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्पा मसाज पार्लरवर एक बनावट ग्राहक पाठवला.

बनावट ग्राहकाला स्पा सेंटरचा मॅनेजर राजू माधुजी जाट (रा. कलोधिया तहसिल पिंपरी, जि. भिलवाडा राजस्थान) याने बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर या सेंटरवर छापा टाकण्यात आला. दोघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ४ पिडीत महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप निराधार महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले.

तर मॅनेजर आरोपी राजू जाट याला अटक करण्यात आली. ही कारवाई एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरिक्षक शरद बागल, महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, वैशाली महाजन, प्रियंका कोळी, मंगला तायडे, दीपक चौधरी यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment