चाळीसगावातील लॉजवर चालणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह तीन अटकेत !

जुलै 4, 2025 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । चाळीसगाव शहरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी सिनेस्टाईलरीत्या छापेमारी केली. याप्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

kuntankana jpg webp

याबाबत असे की, चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना पकडल्या गेल्या असून लॉज व्यवस्थापक प्रसाद गवळी, मनोज गवळीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या महिलेला धुळे येथील महिला सुधार कक्षात रवानगी करण्यात आली. बनावट ग्राहकांमार्फत रचलेल्या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन रूम मधून बनावट ग्राहकांसह दोन महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पीडित महिलेला धुळे महिला सुधारगृहात पाठवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now