विनोद देशमुखांनी धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

मे 26, 2021 9:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ मे २०२१ – शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना फोनवरून शिवीगाळ करीत धमकविल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश तुलसीदास टेकवानी रा.आदर्श नगर यांच्याकडून मनोज वाणी यांनी जुनी कार खरेदी केली होती. गाडीचे पैसे घ्यायचे असल्याने ते नेहमी धमकी देत होते. दि.२१ मे रोजी रात्री ११.३० वाजता टेकवानी यांना फोन करून शिवीगाळ करीत माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल असा दम दिला.

दरम्यान, टेकवानी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल केली असून मला व माझ्या परिवाराला धोका निर्माण झाल्यास त्यास विनोद देशमुख आणि मनोज वाणी जबाबदार असतील अशी तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now