जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर शहरात दमदाटी करून पैसे हिसकावणे, मारामारी करून दहशत पसरवणे अशा विविध गुन्ह्यातील एका संशयिताला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची दहशत कमी करण्यासाठी संशयिताची न्यायालय ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत पोलिसांनी गुरुवारी धिंड काढली.
शुभम देशमुख (रा.संविधान चौक) असे संशयिताचे नाव आहे. याच्यावर अमळनेर पोलिस स्थानकात २३ गुन्हे दाखल आहेत. २ रोजी सांयकाळी संशयित हा शहरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी सहकाऱ्यांच्या तीन पथकांद्वारे सापळा रचला. गलवाडे रोडवरील प्रताप मिल कम्पाउंड येथे संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले.
दरम्यान, पोलिसांना संशयित देशमुखने भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. तर त्याचा दुसरा साथीदार राहुल किशोर वानखेडे (रा.लोण चारम) यास दुसऱ्या पथकाने घरून ताब्यात घेतले.
हे देखील वाचा :
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध
- मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने चाळीसगाव हादरले; संशियत CCTV कॅमेऱ्यात कैद..