बीएचआर घोटाळा : पोलिसांनी न्यायालयात दिली ‘हि’ महत्त्वाची माहिती
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात फार मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी तब्यत घेतलेल्या १२ पैकी उर्वरित ९ संशयिताना आज न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सर्व संशयितांवर गंभीर आरोप ठेवले आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून आगामी काळात जिल्ह्यात अजून काही मोठ्या दलालांवर कारवाई होणार असल्याचे कळते.
१) भागवत गणपत भंगाळे : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा नवी पेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००६५ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,२८,४०, ३९६/ पैकी १,०५,३९,८९६/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ६० मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असून तुमच्या ठेवींचे पैसे बुडाले, आमच्या व्यतिरिक्त कोणीही आणि पतसंस्थाही पैसे देणार नाही, जेवढे पैसे मिळतील तेवढे घ्या अन्यथा तुमचे पैसे बुडाले, अशी भिती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून इतर आरोपी नामे जितेंद्र कंडारे, सुजित वाणी व इतर यांच्या मदतीने स्वत:चे कर्जखाते १०० टक्के प्रमाणे निरंक केल्याच्या नोंदी करून घेतल्या.
२) छगन शामराव झाल्टे : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००२० मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये २९६, १३,३८९/-पैकी २९६,१३,३८९/ रूपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००३३ मधील एकूण बाकी कर्ज रक्कम रूपये ७५,६६,५३३/- पैकी ७५,६६,५३३/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या १६७ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर सह्या कराव्या लागतील तरच ३० टक्के रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. अशी भीती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून इतर आरोपी नामे जितेंद्र कंडारे याच्या मदतीने त्याचा एजंट अनिल पगारीया यांचेकडून ठेवीदारास ३० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
३) जितेंद्र रमेश पाटील : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००३४ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये ५०,१९,२३९/-पैकी ५०,१९,२३९/ रुपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००२३ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रुपये १७,३७,२१३/- पैकी १७.३७,२१३/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ९८ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के रक्कमच मिळेल अशी भिती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट, संतोष बाफनायांच्यामार्फत ठेवीदारास ३० ते ४० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
४) असिफ मुन्ना तेली : सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०२३७२०७००००१ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १, १२, १२, १२५/-पैकी १,०१,१२,१२५/ रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ४४ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के रक्कमच मिळेल, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट, संतोष बाफना याचेकरवी ठेवीदारास ३० ते ४० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
५) जयश्री शैलेश मणियार : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा नवी पेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००४२ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०४,८३,०६०/-पैकी ८९,६७,०६०/ रुपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ५६ मुदतठेव पावत्या ३० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने आता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० टक्के रक्कमच मिळेल त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व स्टॅम्पपेपरवर तुमच्या सह्या करून तुमचे आधारकार्ड व पॅनकार्ड झेरॉक्स द्या तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंटकरवी ठेवीदारास ३०टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
६) संजय भगवानदास तोतला : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा नवीपेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००४३ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०२,९३,६७२/-पैकी ९१,४१, १७२/ रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या २१ मुदतठेव पावत्या ३० ते ३५ टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने काहीही झाले तरी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत, मी सांगतो तसे केले तरच ३५ टक्के पर्यंत रक्कम मी तुम्हाला मिळवून देईन आत्ता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३५ टक्के रक्कमच मिळेल अन्यथा कसलीच रक्कम मिळणार नाही त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही स्टॅम्पपेपरवर तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तुमच्या सह्या करून द्याव्या लागतील तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचें वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट अशोक रूणवाल करवी ठेवीदारास ३५ टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
७) राजेश शांतीलाल लोढा : बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००२६ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०२,१६,१६४/-पैकी ८७.१६.१६४/ रुपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००२५ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये २९.२८,३९८/- पैकी २३.४३,३९८/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या १११ मुदतठेव पावत्या ३० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना तुम्हाला तुमचे ठेवींचे बदल्यात फक्त ३० टक्केच रक्कम मिळेल मान्य असेल तर बघा अन्यथा पैसे मिळणार नाहीत. असे कंडारे यांचे सांगण्यावरून शिरीष कुवाड यांनी ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तयार करून घेवून मुदत ठेवीच्या मुळ पावत्या कमी किमतीत घेवून जितेंद्र कंडारे याचे मदतीने एजंट करवी ठेवीदारास ३० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
८) प्रितेश चंपालाल जैन : यांनी बीएचआर पतसंस्था शाखा धुळे येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ००११२०१००००७ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रुपये २,१३,३३,६५८/-पैकी १,५१,०९.९२९/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ७४ मुदतठेव पावत्या ३० ते ४२ टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने काहीही झाले तरी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत, मी सांगतो तसे केले तरच वरीलप्रमाणे रक्कम तुम्हाला मिळवून देईन आता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४२ टक्के रक्कमच मिळेल. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सागून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट अशोक रूणवाल, अजय ललवाणी, अनिल पगारीया करवी ठेवीदारास ३० ते ४२ टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.
वरील नमूद आरोपीनी सदर पतसंस्थेतुन कर्जाच्या नावाने घेतलेला ठेवीदारांचा पैसा पुर्ण परतफेड न करता पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र गुलाबराव कंडारे, सुजित सुभाष वाणी व इतर यांच्याशी संगनमत करून पुर्ण रक्कम परत फेड केल्याच्या खोटया नोंदी करुन ठेवीदारांना केवळ ३० ते ४५ टक्के रक्कम बेकायदेशिररित्या अदा करून महाराष्ट्र मल्टिस्टेट को. ऑप अॅक्ट २००२ चे नियम २९ चे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर उल्लंघन केले आहे. इतर ठेवीदारांना सुध्दा त्यांच्या कष्टाची व हक्काची रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक असताना या गैरकृत्यामुळे त्यांना वंचित ठेवले असे स्पष्ट म्हंटले आहेत.
येत्या काळात बीएचआर प्रकरणात नेमक्या काय काय कारवाया होतात हे पाहावे लागणार आहे.