Bhusawal : 6 हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार 6 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गणेश पोपटराव गव्हाणे (रा. जामनेर) लाचखोर हवालदाराने नाव असून या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
शेतकर्‍याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेला होता. यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हवालदार गणेश पोपटराव गव्हाळे याने लाचेची मागणी केली होती. यामुळे सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, आज सकाळी मांडवेदिगर फाट्याजवळ सहा हजारांची लाच घेताना गणेश गव्हाळे याला जळगाव एसीबीने रंगेहात पकडले.

या कारवाईने लाचखोर पोलिसांच्या गोटात खळबळ उडाली आहे