⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | जळगावात चोरीच्या 14 मोटारसायकली, 6 रिक्षांसह चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावात चोरीच्या 14 मोटारसायकली, 6 रिक्षांसह चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. शहरातून प्रत्येक दिवशी दुचाकी चोरी होत असल्यामुळे चोरट्यांवर लक्ष ठेवणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या दुचाकीवर फिरणाऱ्या एका चोरट्याला पकडले. त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या तिघांकडून १४ मोटारसायकली, ६ रिक्षा अशी २० वाहने पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हा शाखेच्या निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन आदींच्या पथकाने चोरीच्या गाड्यांची लिंक पाळधीत असल्याचे कळले. त्यांनी तेथे जाऊन लक्ष ठेवून शनिनगर भागात राहणारा मुस्तकीम अजिज पटे (वय २८) हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात चोरीला गेलेली मोटारसायकल वापरत असताना दिसला.

त्याला ताब्यात घेऊन पोलिस खाक्या दाखवून विचारपूस केल्यावर त्याने अमीन कालु मनियार, (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला, पाळधी) व जाबीर सलामत शेख (वय २७, रा. ईदगाह प्लाट, पाळधी) यांची नावे सांगितली. चोरट्यांनी २२ लाख ४० हजार रुपयांच्या एकूण १४ मोटारसायकली व ६ ऑटो रिक्षा चोरल्या आहेत. त्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या. चोरट्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.