जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । शहरात प्रेशर हॉर्न व कर्कष सायलेन्सर लावुन टवाळकी करणाऱ्या तरुणांवर बहुत शाखेने अचानक सर्जिकल स्ट्राईक केला. काल दिवसभरात१३ बुलेट वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त करत त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा दंड वसुल केला.
काही टवाळ तरुण गाड्यांचे साधे सायलेन्सर बदलवुन मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून शहरातील काही भागात तावलगिरी करतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, शासकीय कार्यालय, न्यायालय अशा सायलेंट झोनमध्ये ध्वनी प्रदुषण होऊन नियम मोडलेजात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या.
पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी शहरात बुलेट चालकांविरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरु केला.यावेळी शहरातील महत्त्वाच्या चौकांमधून एकुन १३ बुलेट जप्त करण्यात आल्या. येत्या काही दिवसात हि कारवाई अजून तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुनगर यांनी दिली आहे.