जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तथा कवी रमेश विरभान धनगर यांची उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी निवड झाली आहे.
उत्तम अहिराणी कवी
येथील कवी कट्ट्यावर २३ एप्रिल रोजी ते आपली काव्यरचना सादर करणार आहेत. या आधी ही त्यांनी डोंबिवली तसेच नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. ते उत्तम अहिराणी कवी, सूत्रसंचालक असून त्यांनी विविध समाज माध्यमांवर साहित्यिक, संशोधक, कवी, कथाकार यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
कौतुक
त्यांच्या या निवडीबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. पूनम पाटील, मंत्रालयातील अवर सचिव प्रशांत पाटील, मसापच्या पुणे शाखेचे विभागीय कार्यवाह तथा मराठी साहित्य महामंडळ सदस्य प्राचार्य तानसेन जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भडगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. सुरेश कोळी, कार्याध्यक्ष डॉ. वाल्मीक अहिरे, प्रमुख कार्यवाह संजय सोनार व शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.