जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । पेन व डायरी मागण्याच्या बहाण्याने पतीच्या खिश्यातून ३ हजार ५०० रुपये लांबवणाऱ्या एक इसमाला वृद्ध पत्नीसह नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना १९ रोजी अमळनेर बसस्थानकावर घडली.
वावडे येथील हिम्मत पाटील आपल्या पत्नीसह बाजारात आले होते. एक इसमाने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला परंतु हिम्मत पाटील यांनी पेन नाही सांगतच डायरी द्या म्हणून त्यांच्या खिश्यातून साडे तीन हजार रुपये काढून पळ काढला. वृद्ध इसमाला त्याच्या पाठीमागे धावता आले नाही.
मात्र आरोळ्या मारताच नागरिकांनी चोराला बसस्थानकाजवलील डी आर कन्या शाळेजवळ पकडले. हे कळताच हिम्मत पाटील यांची वृद्ध पत्नीही तेथे पोहचली आणि नागरिकांसह तिनेही काठीने चोराला चांगलाच चोप दिला. पैसे मिळाल्यामुळे तक्रार न करता त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता सोडून देण्यात आले.