जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर असून सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करायचे आहेत.

या पदांसाठी होणार भरती
पंजाब नॅशनल बँकेत खालील पदांसाठी एकूण ३० जागा भरण्यात येणार आहेत:
ऑफिसर (सिव्हिल इंजिनियर) – JMG स्केल I
ऑफिसर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) – JMG स्केल I
ऑफिसर (मेकॅनिकल इंजिनियर) – JMG स्केल I

पात्रता आणि अनुभव
ऑफिसर सिव्हिल इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी संबंधित शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे किमान १ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. मेकॅनिकल इंजिनियर पदासाठीही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. किंवा बी.टेक पदवी आवश्यक आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हीही ऑनलाइन अर्ज करु शकतात.











