सरकारी योजना

केंद्राची पीएम विद्यालक्ष्मी योजना : मुलींना साडेसात लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार, किती व्याजदर लागेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । पैसे नसले तर तुमचं शिक्षण थांबणार नाही. कारण, सरकारने आता याची जबाबदारी घेतली आहे. मुलींना देशभरातील मोठ्या शैक्षणिक संस्थांत उच्च शिक्षण घेण्यासाठी आता केंद्र शासनाने पीएम विद्यालक्ष्मी योजना अंमलात आणली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नुकतेच देशभरातील सर्व विद्यापीठांमार्फत महाविद्यालयांना पत्र देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मुलींना विना गॅरेटर व मॉर्टगेजने 3 टक्के व्याजदराने साडेसात लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.

या योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी देशातील ८६० शैक्षणिक संस्थांशी केंद्र शासनाने करार केला आहे. पीएम उच्च तर शिक्षा अभियान अंतर्गत ही योजना काम करणार असून, यंदा योजनेचे पहिलेच वर्ष आहे. त्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी नावाने तयार केलेल्या पोर्टलवर जाऊन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेत असताना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या संदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी नुकतेच महाविद्यालयांना पत्र पाठवून योजनेची माहिती दिली आहे. इच्छुक विद्यार्थिनी अर्ज करू शकतात.

यंदापासून मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत महाराष्ट्रात
या वर्षापासून मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत दिले जाते आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ केले आहे. त्यामुळे ८५ टक्के शुल्कातून दिलासा मिळतो आहे. विद्यालक्ष्मी योजनेतून महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेता येणार आहे. यामुळे राज्यातील मुलींसाठी ही योजना लाभदायी ठरू शकते.

योजनेचे नियम काय आहेत?
भारत सरकार 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 75 टक्के क्रेडिट गॅरंटी प्रदान करेल, ज्यामुळे बँकांना विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कव्हरेज आणि समर्थन वाढविण्यात मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज आकारले जाणार आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या पूर्ण व्याज सवलती व्यतिरिक्त ही सवलत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button