---Advertisement---
वाणिज्य

PM किसानच्या 14 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! ही कागदपत्रे तयार ठेवा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यात पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिला जात असून 2-2 हजार हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मानचा 13 वा हप्ता रिलीज झाला होता. आता शेतकरी 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशातच लवकरच 14 व्या हप्त्याची तारीख समोर येऊ शकते.

pm kisan jpg webp

या योजनेसाठी अर्ज कसा करावा
पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करण्यासाठी, अर्जदाराने प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in ला भेट देणे आवश्यक आहे.
वेबसाइटच्या होमपेजवर फार्मर कॉर्नरवर जा.
येथे ‘New Farmer Ragister’ वर क्लिक करा.
यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा.
यानंतर, “Click Here To Continue” या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, ‘YES’ वर क्लिक करून PM किसान नोंदणी फॉर्म 2023 भरा.
फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

---Advertisement---

या कागदपत्रांची आवश्यकता आहे
या योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे, नागरिकत्व प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. याशिवाय शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्याचा तपशीलही द्यावा लागणार आहे. कारण सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील. त्याच वेळी, तुम्हाला एक सक्रिय मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला त्याच्याशी संबंधित संदेश मिळत राहतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---