⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ : घाण साफ होईना

जळगाव लाईव्ह न्युज | ५ जून २०२२ | जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची अवस्था अस्वच्छेमुळे बिकट झाली आहे. जागोजागी नागरीकांनी थुंकून ठेवल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर कचऱ्याचे ढीग देखील पाहायला मिळत आहेत. पेशंटच्या वॉर्ड शेजारूनच हॉस्पिटलममध्ये येणारे घाण पाणी साचले आहे. यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. तसेच वॉर्डच्या खिडक्यांजवळ स्वतः रुग्णांचे नातेवाईक कसाही वावर करत असल्याने रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये साचणारा वैद्यकीय व इतर प्रकारचा कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा गोळा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी हॉस्पिटलच्या आवारात थोडा बहुत प्रमाणात कचरा असतोच. मात्र सगळ्यात वाईट बाब म्हणजे याठिकाणी नागरिक सर्रासपणे गुटख्याचे किव्वा पानाचे फवारे मारतात. याच बरोबर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक असतात. या नातेवाईकांकडून देखील परिसरात कचरा टाकला जातो. जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते. नारळ, ज्युसच्या बाटल्या आवारातच फेकून दिल्या जातात. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगही फेकलेल्या आढळतात. हॉस्पिटलच्या अस्वच्छतेत यांच्याकडूनही हातभार लावला जातो. कर्मचाऱ्यांनी सफाई केल्यानंतर थोड्यात वेळात पुन्हा कचरा साचतच राहतो.

वेळो वेळी रुग्णालयाचे कर्मचारी हा कचरा किवावं घाण साफ करायचा प्रयत्न करतात मात्र नागरिकांच्या हलगर्जी पणामुळे रुग्नालयात अस्वच्छता राहतेच. यामुळे रुग्णालयाची स्वतः नागरिकांनी देखील जवाबदारी घेणे गरजेचे आहे. याच बरोबर जिल्ह्यात जितकेही वैद्यकीय रुग्णालये आहेत त्या ठिकाणी देखील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी