⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वयंप्रतिकार शक्ती विषयावर कार्यशाळा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वयंप्रतिकार शक्ती या विषयावरील कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंप्रतिकार शक्ती या विषयावर डॉ.केतकी पाटील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास वाघ, प्रशांत गुडेट्टी या मान्वरांच्या हस्ते दिप्रज्वलन करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत प्रणोती धारस्कर, साहील राजेंद्र, ऋतुजा हनुमंत, अरमान अलाउद्दीन, गणेश परमेश्‍वर, अस्मिता शैलेश, प्रचेता प्रकाश, उत्कर्ष गोवर्धन, प्रणव शाम, फुरखान सिद्दीकी, अदिती सतीश, राजू चिंचकर यांनी स्वयंप्रतिकार शक्तीशी संबंधित विविध विषयांवर सादरीकरण केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी केले.