⁠ 
रविवार, मे 5, 2024

बुलेट खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचा..नाहीतर लाखो रुपये जातील पाण्यात!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । Royal Enfield च्या Classic 350 आणि Bullet 350 बाईकने भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये होंडा व जावासारख्या कंपन्या देखील आपले नाव रुजवण्याचा प्रयत्न करताय परंतु, अनेक तरुणांची चाहती ही आजही Royal Enfield 350 CC चं आहे.

मात्र बुलेट जितकी चांगली आहे तितकेच तिचे दुष्परिणाम देखील आहेत. यामध्ये ५ अशी कारणे आहेत ज्यामुळे विकत घेतल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणूनच रॉयल एनफील्ड बाइक खरेदी करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

किंमत
बाजारात बाईक्सची किंमत वाढते आहे, पण रॉयल एनफिल्डच्या बाईक त्याहूनही महाग मिळतात. तुम्हाला कंपनीची सर्वात स्वस्त बाईक 1.5 लाख रुपयांमध्ये मिळेल, परंतु जर तुम्ही क्लासिक, हिमनलेन किंवा मेटियर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची किंमत 2 ते 2.50 लाख रुपयांपर्यंत असेल. या रकमेत तुम्ही तीन स्प्लेंडर प्लस देखील खरेदी करू शकता.

खर्च
बाईकच्या खर्चाबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला इतर बाईकच्या तुलनेत रॉयल एनफिल्डसाठी अधिक खर्च करावा लागतो. यासाठी जवळपास 3000 ते ₹5000 खर्च करावे लागतील. याशिवाय रॉयल एनफिल्डमधून मूळ स्पेअर पार्ट्स खरेदी करणे देखील इतर बाईकच्या तुलनेत तुम्हाला अधिक महागात पडू शकते.

वैशिष्ट्ये
रॉयल एनफिल्ड बाइक्स खूप महाग असू शकतात, परंतु त्यांची वैशिष्ट्ये कमी आहेत. ही बाईक एलईडी लाइटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नाही. तसेच, डिजिटल स्पीडोमीटर आणि डिजिटल घड्याळ सारखी वैशिष्ट्ये नाहीत. तुम्हाला ट्रिपर नेव्हिगेशन खरेदी करावे लागेल.

वजनाने जड
रॉयल एनफिल्ड बाईकचा आणखी एक मोठा दुष्परिणाम म्हणजे या बाईकचे वजन खूप जास्त आहे. या बाइक्सचे वजन 190 ते 195 किलो असते. शहरात या बाइक्सवर लोकांना नियंत्रण ठेवण्यात कठीण जाते. तसेच, या बाइक्सच्या सीटची उंची कमी लोकांसाठी जास्त आहे, ज्यामुळे हाताळणे आणि चालवणे आणखी कठीण होते.

मायलेज
रॉयल एनफिल्ड बाईकचे मायलेज बाजारातील इतर बाईकच्या तुलनेत कमी आहे. बाजारातील काही बाइक्स 80 ते 100 kmpl चा मायलेज देऊ शकतात, तर Royal Enfield बाईक 30 ते 35 kmpl चा मायलेज देतात. काही बाबतीत, रॉयल एनफिल्ड बाईकचे मायलेज हॅचबॅक कारसारखेच आहे.