⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | गुन्हे | जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ! दोन जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ! दोन जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल उर्फ पिया सुनिल कुडे (वय २४, रा. एम.जे.नगर, चाळीसगाव) व शेख चॉंद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत.

निखील उर्फ पिया सुनिल कुडे हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे‌‌ ५ गुन्हे दाखल‌ होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शेख चाँद शेख हमीद‌ हा २०१५ पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे एकूण ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मंजूरी दिल्याने त्यांच्या विरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा व कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.